🔀Search
-

2021-22 या वर्षात 163 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर गहू आणि धान यांच्या हमीभावाने खरेदीचे 2.37 लाख कोटी रुपये थेट जमा
01-Feb-2022 - 0 Comments.
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आज संसदेत सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी सांगीतले की : “2011-22 च्या रब्बी हंगामातील गहू आणि खरीप हंगाम 2021-22 मधील आगामी धानची खरेदी याद्वारे एकूण 1028 लाख मेट्रीक टन गहू आणि धान 163 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी केलं गेलं आणि त्यासाठीचे हमीभावाने झालेले 2.37 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.”







